नागराज अण्णाला वाढदिवसानिमित्त एक भावनिक साद..!
नागराज अण्णाला वाढदिवसानिमित्त एक भावनिक साद..! (सैराटचा, पहिल्याच दिवशी पहिलाच शो पाहिल्यानंतर मनात निर्माण झालेले उत्कट भाव) आपलं फार मोठं काहीतरी हरवलंय याच भ्रांतीत कायम असावं , त्याच्या नव्हतेपणाच्या हुरहुरीत सतत झुरत रहावं पण ' नेमकं आपण काय शोधतोय ?' हेच मुळात आपल्याला ठाऊक नसावं... किंवा , मनांत खोलवर कुठेतरी रुजलेलं अन् आपल्याही नकळत जोपासलं जाणारं किंवा , आपल्यांस जाणिव असूनही काही कारणांमुळं स्वत:हून दाबून आणि बंदिस्थ ठेवलेलं ' प्रेम ' कुणाच्या तरी आकस्मात समोर येण्यानं उफाळून यावं... तुटून जावेत सारे पाश... , आणि मग त्या मुक्त प्रेमाची आपल्यांस इतकी नशा चढावी कि , त्या कैफेला ' झिंगाट ' होऊन मनसोक्त अनुभवण्याच्या नादात स्वत:चं अस्तित्वही विसरुन बेधुंद , बेबंध , बेलगाम म्हणजेच अगदी ' सैराट ' व्हावं...! कित्येक जन्मांपासून आपण ह्या गोष्टीला/व्यक्तीला शोधत होतो याची खात्री पटावी आणि आत्ता ती गवसलीय या विलक्षण आनंदानं भारुन जावं.... अश्या भावना उत्पन्न करु शकणारी गेल्या कैक महिन्यातली ही एकमेव कलाकृती... ," सैराट...