Posts

Showing posts from August, 2019
Image
' माणुसकीचे वारकरी '        आज कोल्हापुरात सकाळी रूममधून घाईघाईत बाहेर पडत होतो. पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ पुरविण्याची मदत , म्हणून लगबग सुरु होती. मी गाडीवर निघालेलोच होतो कि , एक महत्वाचा कॉल आला. गाडी बाजूला घेऊनच बोलणं झालं. अन्न पॅक झालंय आणि आता ते कुठे पोहोचवायचं हे त्या गाडीवानांना सांगण्यासाठी ते माझी वाट बघत थांबले होते. बारीक पावसाची रिपरिप सुरूच होती. म्हणून बोलून झाल्यावर घाईघाईतच माझा लाडका ‘आयफोन’ जॅकेटच्या बाजूच्या खिशात ढकलला आणि मी मार्गस्थ झालो. गाडीत पेट्रोल जेमतेम चार-एक किलोमीटर्स साठी पुरेल एवढंच त्यामुळे इतर कुठेही न जाता तडक त्याच ठिकाणी पोहोचायचं म्हणून मी गाडी विद्यापीठाच्या ८ नंबरच्या गेटमधून आत घातली. बराच पुढे आलो आणि तिकडे वाट बघत थांबलेल्या लोकांना फोनवरून जागा सांगून पुढे निघण्याची सूचना करावी म्हणून फोन काढण्यासाठी खिसा चाचाचपला तर फोन नव्हता. जीव कापरा झाला. गाडी थांबविली परत फिरलो. मग आठवलं. पेट्रोल कमी आहे. तसाच मग पुन्हा माघारी फिरलो आणि ठरलेल्या जाण्याच्या दिशेला निघालो विद्यापीठाच्या १ नंबर गेटवर ती गाडी स्वयंसेवकांसह माझी ...