Posts

Showing posts from August, 2021

नागराज अण्णाला वाढदिवसानिमित्त एक भावनिक साद..!

Image
नागराज अण्णाला वाढदिवसानिमित्त एक भावनिक साद..!   (सैराटचा, पहिल्याच दिवशी पहिलाच शो पाहिल्यानंतर मनात निर्माण झालेले उत्कट भाव)  आपलं फार मोठं काहीतरी हरवलंय याच भ्रांतीत कायम असावं ,  त्याच्या नव्हतेपणाच्या हुरहुरीत सतत झुरत रहावं पण ' नेमकं आपण काय शोधतोय ?' हेच मुळात आपल्याला ठाऊक नसावं... किंवा , मनांत खोलवर कुठेतरी रुजलेलं अन् आपल्याही नकळत जोपासलं जाणारं किंवा , आपल्यांस जाणिव असूनही काही कारणांमुळं स्वत:हून दाबून आणि बंदिस्थ ठेवलेलं ' प्रेम ' कुणाच्या तरी आकस्मात समोर येण्यानं उफाळून यावं... तुटून जावेत सारे पाश... , आणि मग त्या मुक्त प्रेमाची आपल्यांस इतकी नशा चढावी कि , त्या कैफेला ' झिंगाट ' होऊन मनसोक्त अनुभवण्याच्या नादात स्वत:चं अस्तित्वही विसरुन बेधुंद , बेबंध , बेलगाम म्हणजेच अगदी ' सैराट ' व्हावं...! कित्येक जन्मांपासून आपण ह्या गोष्टीला/व्यक्तीला शोधत होतो याची खात्री पटावी आणि आत्ता ती गवसलीय या विलक्षण आनंदानं भारुन जावं....   अश्या भावना उत्पन्न करु शकणारी गेल्या कैक महिन्यातली ही एकमेव कलाकृती... ," सैराट...

विज्ञान रुजलं पाहिजेच...

Image
       आज दि. २९ जानेवारी २०१७ या दिवशी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थी तसेच शिक्षक या गटात 'आविष्कार' हा संशोधन महोत्सव, येथील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागाच्या अत्यंत नेटक्या नियोजनासह पार पडला. मानव्यता, शिक्षण तथा सामाजिक शास्त्रे, भूगोल, अन्नशास्त्रे, अभियांत्रिकी, तंत्रज्ञाने, औषध-वैद्यकशास्त्रे तसेच मुळ-शास्त्रांच्या नवनवीन संकल्पना इथे नव्या जोमाच्या संशोधकांकडून हाताळताना पाहायला मिळाल्या. यात अनेकविध उपकरणांच्या प्रतिकृती आणि विविध शास्त्रीय फलकांचा समावेश होता. यातील सहभागी सर्वच अभ्यागतांचा चिकित्सक आणि शास्त्रीय-व्यवहारापुरक दृष्टिकोण या निमित्तानं आवर्जून पाहायाला मिळाला. आविष्कार ह्या महोत्सवाचा हेतूच मुळी संशोधनासाठी विद्यार्थ्यांना उद्यूक्त करणे हा होय. इथे उपस्थित प्रत्येकजन खुप काही नवीन शिकत होतं आणि स्वत:च्या संशोधनासाठी प्रेरीत होत होतं. सर्वांच्याच चेहर्‍यावर एक विलक्षण पोटभरीचं समाधान आणि तितकाच उतावळा चिकित्सकपणा पाहून महोत्सव त्याच्या योग्य दिशेने जातोय या भावनेनं आयोजकांनाही हायसं व...