Posts

Showing posts from 2022

"इस्स स्मार्ट सोलापूर ?"

Image
(IS SMART SOLAPUR ?)     होम मैदानाच्या आणि हरीभाई देवकरन प्रशालेच्या समोरच्या बाजूस असणाऱ्या, जिल्हा परिषद कार्यालयाच्या पार्श्व-भिंतीवर, स्मार्ट सोलापूरच्या लखलखीत वैभवाला अधोरेखित करण्याच्या स्तुत्य हेतूनेच, कैक कष्टाअंति कलात्मक सजावट आणि सोलापूरचा नामोल्लेख करणारी नयनरम्य चित्रे काढून त्या चित्रांना आणि काही सेल्फीगर्क सोलापूरकरांनाही पद्धतशीरपणे रंगवण्यात, आपलं प्रविण जिल्हाप्रशासन उल्लेखनीयरित्या यशस्वी झालेलं आहे.         कालच (अर्थात ११/१०/२०२०) त्यातलं एक चित्र, ज्यामध्ये "I ❤️  SOLAPUR" असा उल्लेख फुलांच्या पार्श्वभूमीवर केलेला होता, ते मी अभिमानानं फेसबुकवर शेअर केलेलं होतं. पण जसं मला इथल्या 'चांगल्या' गोष्टींचं कौतुक करता येतं तसंच माझ्या शहरातल्या काही 'अतुलनीय' गोष्टींवर भाष्यही करता येतंच की. नव्हे नव्हे तो तर माझा अधिकार किंवा त्याहीपेक्षा माझं कर्तव्य जास्त आहे.     तर किस्सा असा कि काही कामानिमित्त मी माझ्या सोलापूर सर्वांप्रमाणेच माझीही असणारी एक नैसर्गिक गरज वजा लघूशंकेच्या निरसनासाठी दुपारी १ वाजल्यापासून ते सायं. ०५:३...